• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वाराचा मृत्यू!

ByEditor

Dec 11, 2023

सलीम शेख
माणगाव :
माणगावपासून ६ किमी अंतरावर असणाऱ्या तळेगाव गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. सदरची घटना रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ६ :३० वाजण्याच्या पूर्वी घडली. याबाबतची फिर्याद तेजस महादेव म्हस्के (वय- ३२ ) रा. मुगवली, ता. माणगाव यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताबाबत गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी तेजस म्हस्के यांचा चुलत भाऊ सूर्यकांत दगडू म्हस्के (वय -२५) रा. मुगवली, ता. माणगाव हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (दुचाकी) क्र. एमएच ०६ बीएक्स ०४९९ हि गाडी घेऊन लोणेरे बाजूकडून मुगवली बाजूकडे जात असताना तळेगाव येथे आल्यावर मुंबई-गोवा महामार्गावर त्याच्या मोटरसायकलला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने धडक देऊन अपघात केला. या अपघातात मोटार सायकलस्वार सूर्यकांत दगडू म्हस्के याच्या डोक्यास, पायास गंभीर दुखापत होऊन तो मयत झाला. तसेच दुचाकीचे नुकसान झाले. या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १३८/२०२३ भादंवि संहिता कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ प्रमाणे करण्यात येऊन अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताचा अधिक तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आर. डी. फाळके हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!