• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

डिकसळ येथील रमेश ज्वेलर्स दुकानात डल्ला मारणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळण्यात नेरळ पोलीसांना यश

ByEditor

Dec 16, 2023

गणेश पवार
कर्जत :
दि. १२ डिसेंबर २०२३ रोजी कर्जत शहरात तीन महिलांच्या सोनसाखळी मोटारसायकलवरून चोरीचा प्रकार घडला असतानाच त्याच दिवशी कर्जत कल्याण राज्य मार्गावरील डिकसळ येथील रमेश ज्वेलर्स या दुकानात भर दिवसा घुसुन दोन चोरट्यांनी डल्ला मारत दोन तोळे सोन्याचे दागिने लांबवत मोटरसायकलवरून पसार झाल्याची घटना घडली होती. तर या गुन्ह्यातील दोन चोरट्यांपैकी एका चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात नेरळ पोलीसांना यश आले आहे. पोलीसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

नेरळ पो. ठाणे गुरनं ३२३/२०२३ आयपीसी ३९२, ३४ दि.१२/१२/२०२३ रोजी १३.२५ वाजता दाखल गुन्हयाप्रमाणे मौजे डिकसळ ता. कर्जत येथील रमेश ज्वेलर्स यांचे सोन्याचे दुकानात घडला होता. आरोपी याने प्रथमता बतावणी करून सोने लुटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो असफल झाल्याने आरोपी याने जबरदस्तीने ड्रॉवरमधून हात घालून दोन तोळे वजनाच्या सोन्याच्या बाळ्या असलेली डबी घेऊन पळून गेले होते. सदर गुन्ह्यात दोन आरोपी यांचा समावेश होता. या गुन्ह्यात आरोपीत यांनी युनिकॉर्न मोटारसायकल वापरली होती. तर सदर गुन्ह्यातील आरोपीत हे पसार झाले होते. सदर गुन्ह्यांची उकळ करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या स्तरावरून देण्यात आलेल्या आदेशानुसार नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी ढवळे, नेरळ पोलीस स्टाफसह घटनास्थळी भेट देत जवळपास व परिसरातील असलेले जवळजवळ ३० ते ३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता सदर गुन्ह्यातील आरोपीतांचे चेहऱ्याचे फोटो प्राप्त केले. सदर आरोपीत हे इराणी समाजाचे असल्याचे निष्पन्न झाले.

गोपनीय बातमीदार यांना याबाबत पोलीसांनी माहिती देत व त्यांना विश्वासात घेऊन आरोपीची माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला असता, नेरळ पोलीसांना सदर गुन्हयातील एका आरोपीचे नाव व राहण्याचे ठिकाण प्राप्त झाल्यानुसार नेरळ पोलीस हे मुंब्रा, जिल्हा ठाणे येथे जाऊन मुंब्रा येथील इराणी वस्तीत राहणारा आरोपी यास भावाचे घरातून उचलून आणले. त्यावेळी त्या ठिकाणी २५ ते ३० इराणी महिलांनी पोलीसांना सदर आरोपीस अटक करून नेण्यास मोठ्या प्रमाणात विरोध व गोंधळ घातला होता. परंतु, त्यास खूप कसोशीने व खडतर प्रयत्नाने नेरळ पोलीसांनी मोहल्ल्यातून बाहेर काढत सदर आरोपीला अटक करून ताब्यात घेतले. आरोपीचे नाव अवलाद हुसेन गुलखान जाफरी (वय ४० मूळ राहणार देवगिरी कॉलनी सेंदवा, जिल्हा बडवाणी, राज्य मध्य प्रदेश सध्या राहणार मुंब्रा इराणी वस्ती) याने गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्याचे सोबत त्याच इराणी वस्तीमध्ये साथीदार आरोपीत याचेकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल होंडा यूनिकॉर्न नंबर एमपी ४६ एमएस ६०२६ व दोन तोळे सोने जप्त केले आहे.

सदर आरोपी यास न्यायालयात हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर सदर गुन्ह्यातील दुसरा फरारी आरोपी याचा शोध हा नेरळ पोलीस घेत आहेत. नेरळ पोलीसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!