खा. सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून ९ कोटींचा निधी मंजूर
महेंद्र म्हात्रे
नागोठणे : गेली कित्येक वर्ष रस्त्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वणी हद्दीतील भिसेखिंड ते चेराठी, काळकाईवाडी, गोयंडावाडी या रस्त्यासाठी अखेर रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या सहकार्याने ६ कोटी रु. इतका भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. तसेच चाफेवाडी मार्गे गोयंडावाडी या रस्त्यासाठी सुमारे ३ कोटी रु. इतका निधी उपलब्ध करून दिला आहे.
वणी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व वाड्यांवरील सर्व ग्रामस्थ गेली कित्येक वर्ष खा. सुनील तटकरे, महिला व बालकल्याण मंत्री माननीय आदिती तटकरे व कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्याकडे या रस्त्यासाठी पाठपुरावा करत होते. या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दोन्ही बाजूंनी रस्ता उपलब्ध करून तटकरे साहेबांनी आदिवासी बांधवांची रस्त्याविना होत असलेली अडचण दूर केली आहे. वाड्या वस्त्यांवर विकासाची गंगा पोहोचविण्यामध्ये तटकरे साहेब नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
शनिवार, दि. १६ डिसेंबर २०२३ रोजी आमदार अनिकेत तटकरे यांची सरपंच प्रगती दिपेंद्र आवाद, उपसरपंच महेंद्र बाबुराव हांबीर, युवा नेते दिपेंद्र आवाद, आदिवासी संघटनेचे गोविंद शिद, कमळाकर बांगारे, मच्छिंद्र लेंडी, मधुकर निरगुडे, भिवा निरगुडे, अनंत निरगुडे, संदेश हंबीर, मधुकर वारगुडे, तानाजी निरगुडे, गणपत पारधी, चंद्रकांत ढेबे, संदीप ढेबे, हिरामण हांबीर, काशिनाथ शिद, नामदेव उघडा, शिद, धाया हांबीर, दुर्गाजी लेंडी आदि ग्रामस्थ यांनी सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले.