• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड तालुक्यातील भोमजई येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर

ByEditor

Dec 17, 2023

प्रतिनिधी
महाड :
तालुक्यातील भोमजई येथे दि. १६ डिसेंबर रोजी २०२३ रोजी माणुसकी प्रतिष्ठान शाखा रोहा आणि जिल्हा परिषद मराठी शाळा भोमजई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर संपन्न झाले. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा भोमजई, तालुका महाड येथे हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन भोमजईचे सरपंच शमशुद्दिन् देवळेकर यांचे हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, रफिक बावडेकर, अस्लम सर, सुधाकर राऊत, शरीफ महालदार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी भोमजई गावातील ग्रामस्थ आणि परिसरातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. राजाराम हुलवान यांनी सध्याच्या युगामध्ये आपल्या आरोग्यासाठी कोणती काळजी घ्यावी व आपले आरोग्य कसे निरोगी राहील ह्याबद्दल अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. सदर् कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोमजई शाळेचे मुख्यध्यापक दादा पवार ह्यांनी केले. दादा पवार आणि माणुसकी प्रतिष्ठान शाखा रोहा यांच्यामार्फत ह्या शिबिराचे उत्तम नियोजन करण्यात आले. भोमजई गावासह आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिरासाठी डॉ. राजाराम हुलवान, डॉ. प्रज्योत पाटील यांच्यासह माणुसकी प्रतिष्ठान जितनगर वायशेतचे सदस्य उपास्थित होते.

माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापाक डॉ. राजाराम हुलवान यांनी महाड येथे माणुसकी प्रतिष्ठानची शाखा सुरु करण्याचे मनोगत व्यक्त केले. त्याचे अध्यक्ष पद पवार सरांनी स्वीकारावे अशी विनंती केली. ह्या विनंतीला तत्काळ पवार सरांनी सहमती दर्शवत महाडमध्ये माणुसकी प्रतिष्ठानची शाखा सुरु होईल असे घोषित केले. सर्व ग्रामस्थांनी व उपस्थित मान्यवरांनी दादा पवार ह्यांना शुभेच्छा दिल्या व उत्तम नियोजनाबद्दल माणुसकी प्रतिष्ठान रोहा शाखेचे व सर्व डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!