विनायक पाटील
पेण : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी २०२३-२०२६ प्रथम टप्प्यातील संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून जोहे गावचे युवा नेतृत्व हर्षल पितळे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलभैय्या लोणीकर, रायगड लोकसभा प्रमुख सतीश धारप, जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, आमदार रवीशेठ पाटील,जिल्ह्याचे सर्व सरचिटणीस, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांच्या मान्यतेने दक्षिण रायगड जिल्हा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे असून पेण तालुक्यातील जोहे गावचे युवा नेतृत्व हर्षल पितळे यांची दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. माझ्यावर पक्ष श्रेष्ठींनी विश्वास दाखवून जी जबाबदारी सोपवली आहे ती मी सार्थ ठरवणार असल्याचे हर्षल पितळे यांनी सांगितले.