• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव-पुणे रस्त्यावर दुचाकीची कारला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

ByEditor

Dec 18, 2023

सलीम शेख
माणगाव :
माणगावपासून जवळच असलेल्या कांदळगाव गावच्या हद्दीत काळनदी पुलाच्या पुढे माणगाव-पुणे रस्त्यावर भरधाव वेगाने असलेल्या दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेला जात स्विफ्ट डिझायर कारला समोरून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सदरील अपघात दि. ५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. सदर मोटार अपघाताचा पोलिसांनी तपास केल्यावर सोमवार, दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी या अपघाताबाबत गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताच्या घटनेची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार किरण तुणतुणे (वय-३९) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील आरोपी तथा मयत उमाकांत तुकाराम फाळके (वय- ३४) रा. शिवाजीनगर वरवंड जि. पुणे याने त्याच्या ताब्यातील स्कुटी क्र. एमएच १२ क्यूएन २५१८ हि गाडी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून पुणे बाजूकडून समोरून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच ०९ डीए ७१४४ या गाडीला विरुद्ध दिशेला जाऊन समोरून जोरात धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार उमाकांत तुकाराम फाळके यांना गंभीर दुखापती होऊन त्यात त्यांचा मृत्यू होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. ३६७ / २०२३ भादंवि संहिता कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८ मोटार वाहन अधीनियम १९८८ चे कलम १८४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!