नागोठणे : कोकण रेल्वे मार्गावरील मध्यवर्ती स्थानक असलेल्या नागोठणे रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून निखिल मढवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नागोठणे जवळील निडी गावचे सामाजिक कार्यकर्ते, निडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य निखिल मढवी यांची दि. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीकरिता मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील नागोठणे स्थानक कन्सल्टेटिव्ह कमिटी नागोठणेचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक हिताचा किंवा सार्वजनिक सोयीचा कोणताही विषय किंवा स्थानकावरील प्रवासी सेवा आणि सुविधांबाबत हि समिती निर्णय घेत असून निखिल मढवी यांच्या निवडीमुळे नागोठणे रेल्वे स्थानकातील अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने हि निवड महत्वाची मानली जात आहे.