• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिशा क्रिकेट अकॅडमी देणार मुरुडमधील खेळाडूंना “दिशा”

ByEditor

Dec 26, 2023

क्रीडा प्रतिनिधी
रोहा :
दिशा क्रिकेट अकादमी रोहाची स्थापना २२ एप्रिल २०१८ रोजी एम. बी. पाटील इंग्लिश स्कूल वरसे रोहा येथे करण्यात आली. यशस्वी सुरुवातीनंतर २०१९ मध्ये दुसरी शाखा एम. डी. एन. फ्युचर स्कूल कोलाड येथील अतिशय सुंदर अशा मैदानावर करण्यात आली. ५ वर्षाचा प्रवास पाहता मुलांची मेहनत व अकादमीचा मूळ उद्देश रायगड जिल्ह्यामध्ये सर्वत्र चांगले क्रिकेट खेळाडू तयार करणे हाच आहे.

मेहबूब एजुकेशनल ट्रस्ट विहूर, मुरुड-जंजिरा ह्या शाळेमध्ये क्रिकेट अकॅडमीचा प्रस्ताव देण्यात आला होता. ह्या शाळेतील प्रशासकांनी तात्काळ तो प्रस्ताव मंजूर केला असून 19 डिसेंबर 2023 रोजी त्यांनी त्याची घोषणा केली. दिशा क्रिकेट अकॅडमीकडून क्रिकेट प्रशिक्षण 4 जानेवारी 2023 ला सुरु करण्यात येणार आहे. ही शाखा सुरु करण्यासाठी असीम शाहबंदर यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच दिशा क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष सुरेंद्र भातिकरे, मुख्य प्रशिक्षक महेंद्र भतिकरे यांनी असीम शाहबंदर आणि मेहबूब एज्युकेशनल ट्रस्टचे विश्वस्त आणि प्रशासक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच मुरुड तालुक्यातून उत्कृष्ट खेळाडू तयार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिशा अकॅडमी यांच्यावतीने देण्यात आले.

नुकत्याच पार पडलेल्या मायक्रोस्कॅन आयोजित लिटल मास्टर ट्रॉफी अंडर-16 टी-20 लीगमध्ये लागोपाठ तीन वर्ष स्पर्धा जिंकून दिशा क्रिकेट अकॅडमिने वर्चस्व गाजले आहे. लवकरच मुरुडमधील शाखेसाठी रोहा व कोलाड शाखेतील खेळाडूंच्या पालकांनी अकादमीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!