भाविकांसाठी मंदिरात पाण्याची सुविधा
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील जाखमाता देवी मंदिराच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २६ रोजी पिण्याच्या पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यासाठी आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून वीस लाखाचा निधी वापरण्यात आला.
बोर्लीपंचतन शहरानजिक असलेल्या जाखमाता देवीच्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तगण येतात. मंदिर हे ऊंच कड्यावर वसलेले आहे. दर्शनासाठी अनेक भाविक पायी जात दर्शन घेतात. त्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळावी यासाठी एक विहीर व तेथून मंदिरापर्यंत पाईप लाईनसाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. त्याप्रमाणे ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली. विहीरीसाठी मेंदडी येथील अरशद नाझिर यांच्याकडून जागा देण्यात आली. या योजनेसाठी आमदार फंडातून वीस लाखाचा निधी वापरण्यात आला. मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत हजारो भाविकांच्या उपस्थितीत माजी आमदार पंडितशेठ पाटील तसेच भावनाताई पाटील यांच्या शुभ हस्ते मंगळवारी या पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
या सोहळ्या प्रसंगी अध्यक्ष राजु पाटील, शिस्ते सरपंच चंद्रकात चाळके, अजित कासार, स्वप्निल बिराडी, रामदास कांबळे, रघुनाथ घाग, चंद्रकांत नाक्ती, संतोष कांबळे, प्रमोद नाक्ति, परशूराम पाटील, अशोक कडू, योगेश धुमाळ, नाना मोहिते, परशूराम बिराडी, गजानन चाळके, बबन घरत, सुधाकर कांबळे, कल्पेश कांबळे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.