• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गत वर्षात गुन्हेगारीला आळा घालण्यात रायगड पोलिसांना यश

ByEditor

Jan 2, 2024

रायगड जिल्ह्यात २८ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये घट

अमुलकुमार जैन
अलिबाग :
रायगड जिल्ह्यात 28 पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, खुन, सोशल मिडीया, लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक, मारामारी दरोडा सारख्या घटना घडल्या होत्या. या घटनांमुळे रायगड जिल्हा होरपळून निघाला असला तरी 70 टक्के प्रकरणात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. तसेच परराज्यातील आरोपींचे धागेदोरे शोधण्यात यश आले आहे. दुसरीकडे रायगड पोलिस दल महाराष्ट्र राज्यात डायल 112 या दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. त्यामुळे रायगड पोलिस कर्तव्यावर अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे.

प्रतिबंधक कारवाईमध्ये मुंबई पोलीस अधिनियम कलम 55 अन्वये 3 गुन्हेगारी टोळया रायगड जिल्हयातुन हद्दपार करण्यात आलेल्या आहेत. मुंबई पोलीस अधिनियम कलम 56 व 57 अन्वये रायगड जिल्ह्यातील 6 इसमांना रायगड जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहे. रायगड जिल्हा पोलीसांनी एकुण 7935 इसमांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे. सन 2022 च्या तुलनेत सदरची कारवाई 1503 ने जास्त आहे.

डायल 112प्रणाली – नागरिकांना आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ मदत होण्याच्या दृष्टीने डायल 112 प्रणाली कार्यन्वित करण्यांत आलेली आहे. जिल्हयाचा प्रतिसाद वेळ 05:50 मिनिटे असा आहे. रायगड जिल्हा राज्यामध्ये डायल 112 प्रणालीतील प्रतिसादाच्या वेळेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. सन 2023 मध्ये रायगड जिल्ह्यात डायल-112 प्रणालीवर दि. 01/01/2023 ते 31/12/2023 पर्यंत एकूण 10,361 कॉल्स आलेले आहेत.

भरोसा सेल
रायगड जिल्हयातील शाळा/ महाविद्यालय/ आश्रमशाळा/ शासकीय आस्थापना या ठिकाणी महीला अत्याचार विषयक कायदा संबंधी जनजागृती करण्यात आली. भरोसा सेल अंतर्गत सन 2023 मध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जामधील 90 महिलांचे समुपदेशन करून त्यांना मदत करण्यात आलेली आहे.

कम्युनिटी पोलीसींग
कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत बडी कॉप, जेष्ठ नागरिक, पोलीस काका/पोलीस दिदी, जागरूक नागरिक अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. सदर उपक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील शाळा/कॉलेज यांना भेटी देवून महिला सुरक्षा व सायबर क्राईम या बाबत 1,444 मुले/मुली व महिला यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.

दरमहात सर्व पोलीस ठाणे स्तरावर खालील प्रमाणे मिटिंग घेण्यात आली असून संबंधित ठिकाणी भेटी देण्यात आलेल्या आहेत.

ज्येष्ठ नागरिक यांच्या पोलीस ठाणे स्तरावर 201 मिटिंग घेण्यात आल्या असून 07 जेष्ठ नागरिकांना कायदेशीर मदत करण्यात आलेली आहे. पोलीस काका /पोलीस दीदी यांनी पोलीस ठाणे हद्दीतील शाळा/कॉलेज यांना 504 भेटी दिल्या व 147 जनजागृती कार्यक्रम घेण्यात आल्या.) जागरूक नागरिक कक्षामार्फत गृह निर्माण सोसायटी मध्ये 180, शाळा/कॉलेज-289, मॉल/मल्टीप्लेक्स-10, हॉस्पिटल -55 व सरकारी कार्यालय-76 भेटी दिलेल्या आहेत. बडी कॉप यांच्या पोलीस ठाणे स्तरावर 135 मिटिंग घेण्यात आलेल्या आहेत.

रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे बेस्ट अचिव्हमेंट

सन 2020 व 2021 या वर्षाकरिता बेस्ट पोलीस युनिटचे पारितोषिक सन 2023 मध्ये देण्यात आले. रायगड जिल्हा पोलीस दलात 272 पोलीस शिपाई व 06 चालक पोलीस शिपाई पदाकरिता जानेवारी मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आली. आखिल भारतीय पोलीस मेळावा सन 2022-23 च्या अक्सेस कंट्रोल प्रकारामध्ये पोलीस हवालदार रमेश कुथे बीबीडीएस पथक यांना कांस्य पदक पाप्त झाले.पोलीस कल्याण निधी वृंधीगत करणेकरीता सागर तरंग या सांस्कृतीक कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. पर्यटकांचे सुरक्षेकरिता समुदकिनारी बीच वॉडन संकल्पना राबविण्यात आली.

350 वा राज्याभिषेक सोहळ्याचे रायगड किल्यावर नियोजनबद्ध बंदोबस्ताचे आयोजन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा आयोजित करून सर्वसाधारण विजेते पद रायगड जिल्हा दलास मिळाले.विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचे सन्मान करण्या करीता नवदुर्गा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सी.सी.टी.एन.एस.प्रणालीत राज्यामध्ये रायगड जिल्ह्याची सी.सी.टी.एन.एस ची कामगिरी उत्कृष्ट असुन राज्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे.सी.सी.टी.एन.एस प्रणाली मध्ये वैयक्तिक विशेष कामगिरीकरीता पोलीस हवालदार जयेश पाटील यांना एन.सी.आर.बी.मार्फत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जनरल चॅम्पियनशिप रायगड जिल्हा पोलीस दलाने 48 वी कोकण परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वीरित्या आयोजन करून, संपूर्ण क्रीडा प्रकारामध्ये 227 गुण प्राप्त करून सलग दुसऱ्यांदा “जनरल चॅम्पियनशिप” पटकाविलेली आहे.

महिला बालकांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्ह्याचे तपास 60 दिवसात पूर्ण करून दोषारोपपत्र सदर करण्यास न्यायालयीन आदेश आहेत. ITSSO (INVESTIGATION TRACKING SYSTEAM OF SEXUAL OFFENCE) या पोर्टल मध्ये महिलांविरुद्ध गुन्हे तपासाची माहिती 60 दिवसात पूर्ण करून भरली जाते. अशा महिलांविरुद्ध दाखल 100% गुन्ह्यांची निर्गती 60 दिवसात करण्यात आली आहे.

2 जानेवारी हा दिवस ” पोलीस रेझिंग डे” म्हणून साजरा केला जातअसून त्यानिमित्ताने दिनांक 02 जानेवारी ते 08 जानेवारी 2024 रोजी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरीच्या 694 गुन्हे घडले असून यामध्ये दरोड्याचे तीन, जबरी चोरीचे 44 ,घरफोडीचे 175 तर चोरीच्या 472 गुन्हे घडले आहेत. या घरफोडी आणि चोरीच्या घटनांसोबत जबरी चोरीच्या घटनांनी हैराण करून सोडले होते. जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या त्यामधील काही उघड करण्यात आल्या आहेत. तर घर फोडीच्या जिल्ह्यात 694 घटना घडल्या आहेत. यामध्ये 454 गुन्ह्याची उकल झाली असून 240गुन्हे तपासावर प्रलंबीत आहेत,

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी लहान मोठ्या 21 दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. पोलिसात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर तपासाला गती मिळाली आणि काही दरोड्याचे गुन्हे उघड झाले आहेत. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खून, बलात्कार, छेडछाड, अपघात, दहशतवादी कारवाया, नैसिर्गक आपत्ती इत्यादी प्रसंगी त्वरीत पोलीस मदत व्हावी, याकरिता प्रतिसाद मोबाईल अॅप्लीकेशन सुरू करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रायगड पोलिसांकडून 841 कारवाया करण्यात आली असून सन 2023 मध्ये जुगार या सदराखाली एकुण 193 छापा कारवाई करण्यात आली असुन 17,40,682/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाहे. दारूबंदी या सदराखाली 615 कारवाई करण्यात आली असून 3,04,788/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अंमली पदार्थ या सदराखाली 18 कारवाई करण्यात आली असून 1,43,516 /-रुपये किमतीचा 8.414 किग्रॅ. वजनाचा गांजा, 3,24,63,05,160/-रुपये किमतीचा 259.713.790 किग्रॅ. वजनाचा मेफेड्रोन व 8,25,11,876/-रुपये किमतीचा 229.633.69 किग्रॅ. वजनाचा चरस जप्त करण्यात आलेला आहे.

जिल्ह्यातील गांज्याचे समुळे नष्ट करण्यासाठी पोलिस विभागाने कंबर कसली होती. आपल्या नजीकच्या परिसरात छुप्या पध्दतीने सुरु असलेल्या गावठी दारु, गांजा, चरस व इतर अंमली पदार्थाच्या विक्रेत्या व पुरवठादाराबाबत माहिती असल्यास किंवा मिळाल्यास तात्काळ त्याबाबतची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्याला अगर पोलीस नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन रायगड पोलीस दलामार्फत करण्यात आले आहे.

ग्रामिण भागासह शहरात ठिकठिकाणी कारवाई करुन लोकल पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने लाखो रुपयांचा गुटखा पकडून तो नष्ट देखील केला. त्यासाठी छापे टाकण्यात आले. दुकानांवर धाड देखील टाकली. तसेच पोलिसांनी केलेल्या सतत कारवाई सत्रामुळे आता गुटका विकणाऱ्यांनाही चाप बसला आहे.

मोटार अपघातांचे वाढते प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने दुचाकी वाहने चालवितांना योग्यती खबरदारी व मोटार वाहन कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. दुचाकी चालवितांना हेल्मेट परिधान न केल्याने बहुतांशी अपघातांमध्ये दुचाकीस्वार हे मरण पावलेले आहेत. त्यामुळे संबंधित मरण पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबावर आघात झालेले असून, त्यांचे कधीही न भरून येणारे नुकसानही झालेले आहे. म्हणूनच दुचाकीस्वारांना आता हेल्मेट सक्तीचे करण्यात आलेले आहे. याबाबत 1लाख चार हजार 525 कारवाई करण्यात आली असून त्यामधून रुपये सहा कोटी,88लाख,8 हजार नऊशे इतका दंड आकारण्यात आला आहे.

पोलीस दलामध्ये रायगड “मर्फी” या नावाचे श्वानाच्या मदतीने 1 महाड MIDC पोलीस ठाणे CR.NO.93/2023 भा.द.वि. कलम 379,511,352, 353, 393, 34 प्रमाणे सदरचा गुन्हा उघडकीस आलेला आहे.

गुन्ह्यांची उकल करण्यावर आम्ही भर देत आहोत. त्याचे सकारात्मक परीणाम दिसून येत आहेत. त्याच बरोबर गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवरही भर दिला जात आहे.

-सोमनाथ घार्गे,
पोलीस अधिक्षक रायगड

गुन्ह्यांवर दृष्टीक्षेप

गुन्ह्याचा प्रकारदाखल/उघड
2021
दाखल/उघड
2023
दाखल/उघड
2023
खून ३८ / ३७ ३८ / ३५ २६ / २४
खुनाचा प्रयत्न २० / २० ३० / ३० २९ / २९
बलात्कार ५८ / ५७ १०६ / १०६ १०० / १००
विनयभंग ८९ / ८४ ११३ / ११० १५२ / १४९

By Editor

One thought on “गत वर्षात गुन्हेगारीला आळा घालण्यात रायगड पोलिसांना यश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!