विश्वास निकम
गोवे-कोलाड : हुतात्मा वीरभाई कोतवाल यांची पुण्यतिथी कोलाड विभाग नाभिक तरूण संघटनेच्यावतीने मंगळवार, दि. २/१/२०२४ रोजी आंबेवाडी कोलाड ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली.
आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यालयातील हुतात्मा वीरभाई कोतवाल यांच्या प्रतिमेचे सर्व समाज बांधवांनी पुजन करून भाई कोतवाल यांना आदरांजली वाहिली. तसेच यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश महाबळे यांनी भाई कोतवाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रविण पवार, सुधीर खराडे, संजय सकपाळ, निलेश खंडागळे, विजय खराडे, किरण खराडे, एकनाथ मोहिते, निलेश पवार, जितेंद्र जाधव, रोहिदास मोहिते, चंद्रकांत हुजरे, उत्तम साळूंखे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते.