• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वसुधा पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पेण विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती

ByEditor

Jan 2, 2024

विनायक पाटील
पेण :
पेण नगरपालिकेमध्ये रामवाडी मधून लगातार पाच वेळा निवडून आलेल्या वसुधा तुकाराम पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पेण विधानसभा मतदार संघ अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशिल राहल. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरण पोहोचवण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा विश्वास आहे.उमा संदिप मुंढे अध्यक्षा रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली वसुधा पाटील यांचे पेन विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वसुधा पाटील यांच्या निवडीमुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवून माझी पेण विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभारी असून मी पक्ष वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे वसुधा पाटील यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!