• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण तरणखोप येथे डिझेलचे दहा टँकर्स जप्त

ByEditor

Jan 3, 2024

९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकास अटक

अमुलकुमार जैन
अलिबाग :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील तरणखोप हद्दीत पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने धडक कारवाई करुन डिझेलचे दहा अनधिकृत टँकर जप्त करून एकुण १ कोटी ४३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत पेण पोलिस ठाण्यात सुरेश शांताराम थळे (वय-५७ वर्षे व्यवसाय शासकिय नोकरी रा. मु.पो. खंडाळा ता. आलिबाग जि. रायगड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवार दिनांक २ जानेवारी २०२४ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तरणखोप येथील हॉटेल शुभलक्ष्मी समोरील मोकळ्या जागेत ट्रक नंबर एमएच ४६ बीयु २३८८, टँकर नं. एमएच ०४ जीएफ ८०१७, टँकर नं. एमएच एजी ४७५३, टँकर नं. एमएच ०४ जीएच २२०३, ट्रक नंबर एमएच ४६ बीयु २३८८, ट्रक नंबर एमएच ३४ बीजी ८१६७, ट्रक नंबर एमएच ०४ जीआर ०५९७, ट्रक नंबर एमएच ०४ जीएफ ८०१७, ट्रक नंबर एमएच ०२ एफजी ४७५३, ट्रक नंबर एमएच ०४ एचएस २२०३ या टँकरमधुन डिझेलची अवैधरित्या वाहतूक व साठवणूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर राज्यस्तरीय दक्षता विभागाच्या विशेष पथकाने ही धाडसी करवाई केली. सर्व टँकरमधुन मिळून एकुण १ कोटी ४३ लाख ६ हजार रुपयांची डिझेल तस्करी पकडण्यात पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाला यश झाले आहे. मोहम्मद अली, जहिर महम्मद लंबे, एमएच ०४ एचएस २२०३ चे मालक, एमएच ०४ एचएस २२०३ चे ट्रान्सपोर्ट, एमएच ०४ जीएफ ८०१७ चे मालक, एमएच ०४ जीएफ ८०१७ चे ट्रान्सपोर्ट, इश्तीयाक (पुर्ण नाव गाव पत्ता माहित नाही), राजु पंडीत (पुर्ण नाव गाव पत्ता माहित नाही), उस्मान (पुर्ण नाव गाव पत्ता माहित नाही) या नऊ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पेण पोलिस ठाण्यात ०२/२०२४, भा.द.वि.सं.क. ४२०, जीवनावश्यक वस्तु, कायदा १९५५ चे कलम ३,७,८, मोटार स्पिरीट अँड हायस्पिड डिझेल (रेग्यलेशन ऑफ सप्लाय डिस्ट्रीब्युशन अँड पिव्हेन्श्न ऑफ माल प्रॅक्टीसेस ऑर्डर २००५ मधील कलम २(ए), २(३), २(एफ), २ (जी), २(टी)३, ३ (१५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोर करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!