अनंत नारंगीकर
उरण : नवी मुंबई – उरण शहराला जोडणाऱ्या प्रवाशी रेल्वे सेवेचा लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते १२ जानेवारी रोजी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.
शनिवारी ( दि. ६) सकाळी ११.३० वाजता उरणच्या रेल्वे स्थानकांत विशेष तपासणी वाहन दाखल झाले असून रेल्वेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश पांडे यांनी खारकोपर ते उरण या मार्गावरील स्थानकांची पाहणी केली आहे. या रेल्वेच्या पाहणी दौऱ्यामुळे खारकोपर ते उरण रेल्वे मार्ग सुरू होण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत.