• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ‘अटल सेतू’ची पाहणी

ByEditor

Jan 6, 2024

घन:श्याम कडू
उरण :
आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच उद्घाटन होणाऱ्या अटल सेतू (न्हावा शिवडी पूल) ची प्रत्यक्ष उरण येथील चिरले गावाजवळ पहाणी केली.

मुंबई येथील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे (एमटीएचएल) येत्या १२ जानेवरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘अटल सेतू’ पाहणी दौरा केला. या प्रकल्पामुळे पनवेलपासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांचे सुमारे १५ कि.मी. इतके अंतर कमी होईल. त्याचबरोबर गर्दीच्या वेळी सुमारे दीड ते दोन तास वेळेची बचत होणार आहे. अटल सेतू उभारणीसाठी २१ हजार २०० कोटी रुपये खर्च आला आहे. १५ हजार १०० कोटी या प्रकल्पासाठी कर्ज घेण्यात आले आहे. सुमारे २५० रुपये चारचाकी वाहनांसाठी टोल असणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, शासकीय अधिकारी वर्ग व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!