• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

ByEditor

Jan 7, 2024

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यातील नाणोरे गावच्या हद्दीत हॉटेल साईलीलाजवळ मुंबई- गोवा महामार्गालगत असलेल्या एका वडाच्या झाडावर ३२ वर्षीय तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. ६ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर नाणोरे गावचे पोलीस पाटील भारत नथुराम पाटोळे (वय- ४२) रा. नाणोरे ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील मयत प्रफुल बर्नट टोप्पो (वय-३२) रा. झारखंड याने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव एका वडाच्या झाडावर अंदाजे १५ फुटाच्या उंचीवरील फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने नाणोरे गावासह माणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नं. १/२०२४ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. डी. आघाव हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!