• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रितम म्हात्रे ‘इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड’ने सन्मानित

ByEditor

Jan 8, 2024

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पुरस्काराचे वितरण

विनायक पाटील
पेण :
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रविवार, दि. ७ जानेवारी २०२४ रोजी पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मेळावा व आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास संपूर्ण देशातील तसेच परदेशातील पुरस्कारार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जे.म्हात्रे यांच्या जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना “इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड”ने संसदरत्न, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल प्रितम म्हात्रेंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!