• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड पत्रकार संघाचे वाचन जनजागृती अभियान

ByEditor

Jan 8, 2024

मिलिंद माने
महाड :
६ जानेवारी पत्रकार दिनी महाड पत्रकार संघाने तालुक्यात वाचन जनजागृती अभियान सुरू केले आहे. तालुक्यातील कोंझर येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयापासून या अभियानाची सुरुवात झाली.

बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा होत असताना या पत्रकार दिनी महाड पत्रकार संघाने वाचन जनजागृती अभियान सुरू केले आहे. डिजिटल युगात प्रत्येक जण वाचनापासून दूर जात असताना दिसत आहे. भावी पिढी देखील अवांतर वाचनापासून दूर झाली आहे. यामुळे वाचन चळवळ राबवण्याचा निर्णय महाड पत्रकार संघाने घेतला असून ६ जानेवारीपासून या उपक्रमास प्रारंभ झाला आहे.

महाड तालुक्यातील कोंझर या गावातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पत्रकारांनी गावातून वाचनविषयक घोषणा देत रॅली काढली. यावेळी महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे, सरपंच विजय कदम, मुख्याध्यापक नामदेव डीगे, ग्रामपंचायत सदस्य अविनाश चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे, गोपाळ कांबळे, सचिव रोहित पाटील आदि पत्रकार उपस्थित होते.

आपल्या भाषणात महेश शिंदे यांनी आज वाचनाचे रूप बदलले आहे असे सांगून आपण सर्वजण डिजिटल माध्यमांचा उपयोग करत आहोत या डिजिटल माध्यमांचा वापर करताना जे चांगलं आहे ते स्वीकारा असे सांगितले. तर कृषी क्षेत्रात वावरताना निसर्गातील अनेक गोष्टी आपल्याला काहीतरी देत असतात. अनेक वनस्पती आपल्याला औषध म्हणून उपयोगात येतात असे राजेंद्र जैतपाल यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन केले पाहिजे कारण यातून आपल्या बुद्धीला चालना मिळेल असे रघुनाथ भागवत यांनी सांगून देशातील ज्यांचे ज्यांचे आपण आदर्श डोळ्यासमोर ठेवतो त्या सगळ्यांनी वाचन केलेले आहे असेही सांगितले. वाचन संस्कार जपले पाहिजेत कारण वाचनातून आपल्याला ज्ञान प्राप्त होते असे अध्यक्ष निलेश पवार यांनी सांगून भावी पिढीने वाचनावर भर दिला तर स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना सोपे जाईल असेही सांगितले.

यावेळी चंद्रकांत कोकणे, मुख्याध्यापक नामदेव डीगे, विजय कदम यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. महाड पत्रकार संघाचे मिलिंद माने, रघुनाथ भागवत, निलेश लोखंडे, नितेश लोखंडे, उदय सावंत, योगेश भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना वर्तमान पत्र भेट देण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!