• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेडच्या माध्यमातून कुडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

ByEditor

Jan 8, 2024

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून जवळील कुडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच प्रमिला मेंदाडकर यांनी केले. कार्यक्रमाला दिघी पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे सुरक्षा प्रमुख कर्नल चंद्रदेव संभ्याल, अदानी फाउंडेशनचे अवधूत पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या शिबिराला विलेपार्ले मुंबई येथील वैद्यकीय टीम, शल्यचिकित्सक डॉ. मयंक प्रधान, स्त्री रोग तज्ञ डॉ. अनुराग मोटवानी, त्वचा रोग तज्ञ डॉ. मारुती मोहन जरग यांनी सेवा प्रदान केली. एकुण 245 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शिबिर आयोजित करण्याचा मुख्य उद्देश हा स्थानिकांना गावातच आरोग्य सुविधा, मार्गदर्शन तसेच औषध मिळावी. तज्ञ डॉक्टर्स यांनी सर्वांना समुपदेशन तसेच मार्गदर्शन केले. त्वचेचे विकार जास्त प्रमाणात आढळून आले. तसेच युवकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना गुडघे दुखी आणि सांधे दुखीचे प्रमाण अधिक आहे. गावकऱ्यांना आहार आणि व्यायाम करण्याचे महत्व डॉक्टर्स माध्यमातून पटवून देण्यात आले. लहान बालकांनी देखील या शिबिराचा लाभ घेतला. दिघी पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे सुरक्षा प्रमुख कर्नल चंद्रदेव संभ्याल यांनी सर्वांना दिघी पोर्ट अदानी फाउंडेशन मार्फत विविध उपक्रमांचा लाभ ग्रामस्थांनी घेऊन सर्वांगीण विकास करून घ्यावा व सर्वांगीण विकासाचे उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले. अवधूत पाटील यांनी अदानी फाउंडेशन माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे आरोग्य संवर्धन उपक्रम विषयी माहिती दिली.

सर्व लाभार्थ्यांना मोफत औषध वितरण करण्यात आले. औषध वितरण व्यवस्था नितीन चांदोरकर माणगाव यांनी केले. अदानी फाउंडेशन च्या ग्राम सखी प्रज्ञा कासारे, सुप्रिया चव्हाण, नम्रता दिघीकर आणि हॉस्पिटल सहायक सिद्धी पाटील,दिघी पोर्ट च्या आरोग्य सेविका मंगल मेंदाडकर यांनी शिबिराला यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!