• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकरी वर्गासह विटभट्टी व्यावसायिक भयभीत!

ByEditor

Jan 11, 2024

विश्वास निकम
गोवे-कोलाड :
मागील दोन दिवसापासून अवकाळी पडणाऱ्या पावसाचा ससेमीरा आता कायमच सर्वांच्या पाठीशी लागल्याने सर्वांचीच कुचंबणा होताना दिसत असुन अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गासह विटभट्टी व्यावसायिक धास्तावले आहेत.

मंगळवार, दि. ९ जानेवारी रोजी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे जाणवत असलेली कमालीची उष्णता अशा परिस्थिती कोणत्याही वेळी पाऊस कोसळेल असा जाणकार मंडळींनी अंदाज बांधला होता. तो खरा ठरत त्याची प्रचिती त्याच दिवशी आली व बघता बघता अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केली. यामुळे शेतकरीवर्गासह विटभट्टी व्यावसायिक यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

लागोपाठ दुसऱ्याही दिवशी तीच परिस्थिती बुधवार दि. १० जानेवारी २०२४ रोजी सकाळपासून असल्याने ढगाळ वातावरणामुळे सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत अवकाळी पावसाने जोरदार सुरवात केली व पावसामुळे वाल, चवळी, मुग, हरबरा, मटकी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय आंबा, काजु व इतर फळ झाडांचे मोहोर गळून पडले आहेत. विटभट्टी व्यावसायिकांच्या तयार केलेल्या कच्च्या विटा भिजून मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!