• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उरण शिवसेनेतर्फे जोरदार निदर्शने

ByEditor

Jan 11, 2024

घन:श्याम कडू
उरण :
मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रेवर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळलेली आहे, हा निकाल लागताच बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण तालुका व शहराच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उरण शहर शाखेसमोर जिल्हाप्रमुख माजी आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत व काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने करण्यात आली, यावेळी जिल्हाप्रमुख मा आमदार श्री मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख श्री नरेश रहाळकर तालुकाप्रमुख श्री संतोष ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सदर निकालाचा निषेध करून उरण तालुका व शहर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पक्ष वाढीसाठी आणखीन जोरदार कामाला लागू असा निर्धार व्यक्त केला.

यावेळी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, जयवंत पाटील, प्रदीप ठाकूर, उपतालुका संघटक के एम घरत, द्रोनागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर शहर संघटक दिलीप रहाळकर, किसन म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, उपशहरप्रमुख कैलास पाटील, गणेश पाटील, विभागप्रमुख श्री अनंत पाटील, श्री रजनीकांत पाटील, नारायण तांडेल, श्री गणेश शेलार, महिला उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका सुजाता गायकवाड, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, शहर संघटिका वीणा तलरेजा, संपर्क संघटिका वंदना पवार, विभाग संघटिका कल्पना गराडे,अल्पसंख्यांक सेलचे अन्वर कुरेशी, एजाज मुकादम, मुमताज भाटकर,रुबीना कुट्टी, साईरा खान, शाखा संघटिका संजना कोष्टी, कविता गाडे, हसीमा सरदार, रुकसाना सय्यद, सरपंच सी. के.गायकवाड, मा . शहरसंघटक महेश वर्तक, उपविभागप्रमुख रवी पाटील, मेघशाम कडू, कामगार नेते गणेश घरत, शाखाप्रमुख शैलेश भोईर, अजय म्हात्रे,रुपेंद्र शाहरुख गाडी फतेह खान, मोहम्मद शेख, नंदू पाटील, सिद्धेश म्हात्रे, उमेश भंडारी, रवींद्र पाटील, करण पाटील, आदी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!