रेल्वेला तब्बल ९६ हजार ५८० रूपयांची कमाई
घन:श्याम कडू
उरण : खारकोपर-उरण रेल्वे मार्गिकेचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर शुक्रवारपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू झाली आहे. या नव्या मार्गिकेवर अप-डाऊन मार्गावर एकूण ४० लोकल फेर्या चालविण्यात आल्या आहेत.
खारकोपर-उरण रेल्वे मार्गावर पहिल्या दिवशी प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी खारकोपर-उरण रेल्वे मार्गावरील लोकलमधून तब्बल सहा हजार ९६६ प्रवाशांनी लोकलने प्रवास केला आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून उरण स्थानकातून २१३० तिकीटांची विक्री झाली असून २९३६ जणांनी प्रवास केला आहे. द्रोणागिरी स्थानकातून १९२२, न्हावाशेवा स्थानकातून १८७० तर शेमटीखार स्थानकातून २३८ प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.