रायगड जिल्ह्यातील मानाची स्पर्धा डीके चषक 2024
विनायक पाटील
पेण : तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी स्पर्धा म्हणजे डिके चषक.ज्या चषकाची प्रेक्षकांसह खेळाडू आतुरतेने वाट पाहतात. या डिके चषकाचे हे तिसरे पर्व शानदार आयोजनाने संपन्न झाले.पेण येथील समाजसेवक दत्ता कांबळे यांनी नगरपालिकेच्या भव्य मैदानावर टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. यावेळी झालेल्या चुरशीच्या सामन्यांत घाटला-मुंबई संघ अंतिम विजेता ठरला. तर खारसापोली-पेण संघ उपविजेता ठरला. पेण तालुक्यामध्ये भव्यदिव्य नियोजनासह 1 लाख रुपये पारितोषिक असलेल्या टेनिस क्रिकेट सामन्यांचे वक्रतुंड मित्र मंडळाकडून आयोजन करण्यात आले होते. सामन्यांतील मालिकावीर घाटला संघाचा प्रीतम म्हस्के याला हिरो कंपनीची मोटारसायकल बक्षीस देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर झालेल्या या क्रिकेट सामन्यांत पनवेल, नवी मुंबई, भिवंडी, ठाणे, पेण, अलिबाग, उरण, महाड, रोहा, खोपोली, कर्जत आदी शहरांतील 32 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतींमध्ये मुंबई चा पराग 11 घाटला संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला, त्यांस 1 लाख रुपये रोख रक्कम व भव्य ट्रॉफी देण्यात आली. तर पेण तालुक्यातील आयुष चॅलेंजर खारसापोली-पेण संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला, त्यांस 50 हजार रुपये रोख व भव्य ट्रॉफी देण्यात आली. तृतीय क्रमांक भूमी 11 फणसडोंगरी-पेण संघास 25 हजार रोख व ट्रॉफी व चतुर्थ क्रमांक रामवाडीचा राजा संघास 25 हजार व ट्रॉफी देण्यात आली. सदर स्पर्धेत मालिकावीर घाटला संघाचा प्रीतम म्हस्के याला हिरो कंपनीची मोटारसायकल बक्षीस देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रामवाडीचा राजा संघाचा निखिल पाटील, उत्कृष्ट फलंदाज भूमी 11 संघाचा बंटी तर उत्कृष्ट गोलंदाज खारसापोली संघाचा विशाल यांना स्पोर्टस सायकल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पेण पत्रकार, पेण पोलिस, डॉक्टर आणि वक्रतुंड मंडळ पेण मध्ये मैत्रीपूर्ण लढत खेळविण्यात आली. यामध्ये पेण पत्रकार अंतिम विजेते तर वक्रतुंड मंडळ उप विजेता ठरला.

सदर सामन्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, माजी आमदार धैर्यशील पाटील, भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, माजी आमदार तुकाराम काते, माजी आमदार पंडीत पाटील, युवा नेते विक्रांत भास्कर जाधव, पनवेल महानगरपालिका विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, समाजसेवक दत्ता कांबळे, श्रीमती साधना कांबळे, पोलीस सहाय्यक आयुक्त धनाजी क्षीरसागर, पेण डीवायएसपी शिवाजी फडतरे, अलिबाग डीवायएसपी अरुण भोर, मुख्याधिकारी जीवन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डी.बी.पाटील, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, दादर सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे, गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर रत्नदीप गवळी, राजेश टेलर, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख प्रदीप वर्तक, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत, नगरसेवक निवृत्ती पाटील, माजी नगरसेवक समीर म्हात्रे, जेष्ठ समाजसेवक अण्णा कडू, माजी जलअभियंते मुंबई महानगरपालिका जीवन पाटील, पेण शहर काँग्रेस अध्यक्ष प्रवीण पाटील, रायगड प्रेस क्लबचे माजी जिल्हाध्यक्ष विजय मोकल,पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष झेन नाईक, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विकास पाटील, प्रसिध्द गायक परमेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर सामने पार पाडण्यासाठी डिके चषक वक्रतुंड मित्र मंडळाचे मंगेश पाटील, राजू कांबळे, राज कडू, लल्ला वास्कर, विनायक पाटील, स्वप्नील पाटील, ओमकार डाकी, शुभम पाटील, रोहन पाटील, सूरज म्हात्रे, सचिन म्हात्रे, नारायण पाटील, प्रवीण पाटील, गजानन पाटील, संदेश पाटील, समीर म्हात्रे, रोहित पाटील, जयेश पाटील, अक्षय कोळी व इतर सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर क्रिकेट सामन्यांत पंच म्हणून संतोष चौधरी, प्रवीण आंद्रे यांनी काम पाहिले तर समालोचन रोशन पाटील, सुभाष टेंबे, परमेश पाटील आदींनी केले.
