• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचा त्रिशाव्या ११ वरसोली संघ अंतिम विजेता

ByEditor

Jan 15, 2024

एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचा निशांत कडवे ठरला मालिकावीर

अमुलकुमार जैन
अलिबाग :
येथील क्रीडाभुवन मैदानावर शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेत त्रिश्राव्या ११ वरसोली हा संघ अंतिम विजेता तर मालिकावीर एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचा निशांत कडवे हा ठरला आहे.

अलिबाग क्रीडाभुवन येथे शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग यांच्या विद्यमाने तीन दिवसीय नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील मल्हार वॉरिअर्स अलिबाग, त्रिश्राव्या 11 वरसोली, धर्मवीर ग्रुप दिघोडी, आझाद 11 कुरुळ, एसपी सुपर प्लेअर्स आंबेपूर, आद्य सप्लायर्स म्हात्रोळी, हार्दीक वॉरिअर्स भोनंग, एम. डी. वॉरिअर्स थळ, सिया वॉरिअर्स नागाव, सरपंच पिंट्या गायकवाड मित्र मंडळ चोंढी, कुबेर 11 अलिबाग, अक्षया हॉटेल 11 अलिबाग, एस. पी. भार्गवी 11 अलिबाग, सिध्दी कन्स्ट्रक्शन कुरुळ, मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव, आर. सी. ग्रुप अलिबाग या 16 संघांनी सहभाग नोंदविला होता.

माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते अंतिम दिवशी होणाऱ्या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत अंतिम विजेत्या त्रिश्राव्या ११ वरसोली संघाला २ लाख रोख, ट्रॅाफी व संघ मालकाला फ्रिज, रनरअप आर. सी. ग्रुप संघाला १ लाख रोख, ट्रॅाफी व संघ मालकाला वॅाशींग मशिन, सेकंड रनरअप एमडी वॅारीयर्स संघाला ५० हजार रोख, ट्रॅाफी व संघ मालकाला सायकल, थर्ड नरअप एस. पी. सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाला ५० हजार रोख ट्रॅाफी व संघ मालकाला सायकल तसेच मॅन ॲाफ द सिरीज निशांत कडवे (एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर) याला ट्रॅाफी व होंडा शाईन मोटरसायकल, बेस्ट बॅालर सिरीज सुमेध पत्रे (त्रिशाव्या ११ वरसोली) ट्रॅाफी व एलईडी टीव्ही, बेस्ट बॅट्समन सिरीज विनोद वाटकरे (आर. सी. ग्रुप) ट्रॅाफी व एलईडी टीव्ही पारितोषिक वितरण करण्यात आले.

या स्पर्धेचे पुरस्कार वितरण अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, प्रदीप नाईक, अॅड प्रवीण ठाकूर, रवि ठाकूर, सवाई पाटील, अॅड गौतम पाटील, अनिल चोपडा, महेश शिंदे, राकेश चौलकर, अशोक प्रधान, अक्षय नाईक, इंद्रनील नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!