अभय पाटील
बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य संतोष कृष्णा कांबळे यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असणाऱ्या बोर्ली पंचतन ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच सायली शंकर गाणेकर यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाल संपल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे संतोष कृष्णा कांबळे यांची उपसरपंच पदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. ग्रुप ग्रामपंचायत सरपंच ज्योती परकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये संतोष कृष्णा कांबळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंच पदी नियुक्त झाल्याची घोषणा सरपंच ज्योती परकर यांनी केली त्यावेळेला सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या उपस्थित होत्या.

नवनियुक्त उपसरपंच संतोष कांबळे यांचे माजी सभापती स्वाती पाटील, जि प सदस्य शामकांत भोकरे, शिवसेना विभागप्रमुख रमेश कांबळे, अनंत मयेकर, चिंचबादेवी देवस्थान अध्यक्ष सुजित पाटील, खजिनदार शंकर गाणेकर, ग्रामविकास अधिकरी अनंत सुळ, शाखाप्रमुख गजू भाटकर, उपशाखाप्रमुख शरद पाटील, चंद्रकांत धनावडे, माजी सरपंच निवास गाणेकर, कृष्णा धुमाळ, कृष्णा पाटील, चिंतामणी वडके यांनी त्यांचे अभिनंदन केले.