• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिरात सुविधांचा अभाव

ByEditor

Jan 25, 2024

मंदिरातील बंद शौचालयामुळे भाविकांची कुचंबणा

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटन स्थळी सुवर्ण गणेश मंदिर या तीर्थक्षेत्री राज्यासह देशभरातील लाखो भाविक दर्शनाला येत आहेत. मात्र, मंदिरातील बंद शौचालय अभावी विशेषतः महिलांची कुचबंना होत असल्याने भाविकांतून नाराजी दिसून येत आहे.

दिवेआगर पर्यटन स्थळ आता प्रसिध्द तीर्थक्षेत्र म्हणून जगाच्या नकाशावर झळकत आहे. त्यामुळे येथील स्वच्छंद समुद्रकिनारी फिरण्यासाठी देशी विदेशी पर्यटकांची, सोबतच पुरातन मंदिरात भाविकांची वर्षभर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. मात्र, सुवर्ण गणेश मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांना येथे बांधण्यात आलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाची सुविधा मिळत नसल्याची तक्रार पर्यटक तसेच स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

दिवेआगरचे पर्यटन वृद्धिंगत­ करणाऱ्या कामाकडे प्रशासनाने लक्ष वेधले आणि त्यावेळी दिवेआगरसाठी 9 कोटीचा निधी मिळाला होता. या निधीचा वापर ज्या­ विकासात्मक उद्दीष्टा­ने होऊन येथे येणाऱ्या पर्यटकांना व भाविकांना सुविधा मिळून पर्यटन वाढीसाठी अपेक्षित होते. मात्र, ­तसे झाले नाही. किंबहुना मंदिरातील शौचालय बंद ठेवल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दिवेआगरच्या पर्यटन व धार्मिक स्थळी शौचालय ही मूलभूत सुविधा मिळाली तर पर्यटकांची संख्या नक्कीच वाढू शकेल. मात्र, माझ्या हॉटेलमध्ये येणारे भाविक नेहमी तक्रार करतात. मंदिरामधील शौचालय मुतारी बंद असते व अभिप्राय लिहण्यासाठी वही देखील नाही.

-देवेंद्र नार्वेकर,
स्थानिक व्यवसायिक.

सुवर्ण गणेश मंदिराचे सुलभ शौचालय नेहमी खुले असते. त्यातून भाविकांना सुविधा देण्यात येते.

-महेश पिळणकर,
अध्यक्ष – श्री गणपती देव व पूजेची नेमणूक ट्रस्ट दिवेआगर.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!