• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोएसोच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

ByEditor

Jan 25, 2024

शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याची घेतली सामुदायिक शपथ

किरण लाड
नागोठणे :
भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे.या मोठ्या लोकशाहीच्या देशात जेव्हा सार्वत्रिक निवडणुका होतात तेव्हा झालेल्या मतदानाची टक्केवारी मतदारांपेक्षा कमी असते.याचा अर्थ काही मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेत नाहीत. हा परिणाम बघता मतदानाचे महत्व प्रत्येक मतदाराला समजण्यासाठी त्यावेळेच्या भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सन २०११ मध्ये देशातील पहिला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यास सुरुवात केली. तो राष्ट्रीय दिवस होता 25 जानेवारी.

नागोठणे येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. ज्या मतदाराला मतदानाचा हक्क मिळालेला आहे. त्या प्रत्येक भारतीय मतदाराने निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे हे महत्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सांगितले गेले. यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान करण्याची सामुदायिक शपथ महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संदेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकुण सात विद्यार्थी सहभागी झाले होते.

आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाच्या वेळी डाॅ.होमी भाभा विज्ञान विद्यापीठ,मुंबई येथे कार्यरत असणाऱ्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी, प्राध्यापिका डाॅ. शुभांगी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संदेश गुरव, प्रा. डाॅ. मनोहर शिरसाठ, प्रा. डाॅ. विलास जाधवर, प्रा. डाॅ. दिनेश भगत, प्रा. श्रीकृष्ण तुपारे, प्रा. डाॅ. स्मिता चौधरी, प्रा. पल्लवी चव्हाण, प्रा. ऋतुजा कर्जेकर, साहिल घरत,मंथन पाटील, कुणाल खांडेकर आदी शिक्षक वर्गासह, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे अधिकारी प्रा. डाॅ. श्रीकृष्ण तुपारे यांनी केले तर सुत्रसंचालन कु. प्रज्वल बगाडे यानी केले. अशाप्रकारे प्रत्येक वर्षी 25 जानेवारीला येणारा राष्ट्रीय मतदार जागरुकता दिन आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात एका अनोख्या पध्दतीने, मतदारांना मतदान करण्याचा राष्ट्रीय संदेश देऊन विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.

By Editor

One thought on “कोएसोच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!