• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण रेल्वे स्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविले; उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या मागणीला यश

ByEditor

Jan 27, 2024

वैशाली कडू
उरण :
उरण रेल्वे स्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. ती मागणी मान्य करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्यात आले आहेत. यामुळे वाहन चालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उरण रेल्वे स्थानकाच्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहन चालकांवर वेगाचे नियंत्रण रहाणार नाही. यामुळे अपघात घडण्याची शक्यता होती. हे टाळण्यासाठी सदर मुख्य रस्त्यावर बसविण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली होती. ती मागणी मान्य होत रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्यात आले आहेत.

उरण रेल्वे स्थानकाच्या बाहेरील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविल्याने अपघाताची शक्यता कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वाहन चालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!