• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गणेश कृपा हौसिंग सोसायटीच्या महापूजेचे २५वे वर्ष

ByEditor

Jan 28, 2024

विनायक पाटील
पेण :
येथील गणेश कृपा हौसिंग सोसायटी गेली २५ वर्ष महापूजेचे आयोजन करत आहे. १९९८ला गणेश कृपा हौसिंग सोसायटीची स्थापना झाली असून आजतागायत एकही वर्ष खंड न पडता गेली २५ वर्ष सलग महापूजेचे आयोजन करून समाजाला मैत्री आणि एकीचे महत्व पटवून देण्याचे काम केले आहे. यावेळी लहान मुलांच्या मनोरंजनासाठी छोटेखानी गॅदरिंगचे आयोजन केले होते. सोसायटीमधील सर्व लहान मुलांनी सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटला.

माजी नगरसेवक शोमेर पेणकर, वडगाव सरपंच आश्लेषा पेणकर, पंचायत समिती माजी सभापती स्मिता पेणकर आदींसह मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहून महापूजेचे दर्शन घेतले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेश कृपा हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष विजय म्हात्रे, सचिव मिलिंद पाटील, खजिनदार रीना म्हात्रे तसेच कमिटी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!