• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण गुरव समाजाच्यावतीने श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त स्नेहसंमेलन

ByEditor

Jan 28, 2024

विनायक पाटील
पेण :
देशाच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२४ रोजी सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा रायगड जिल्ह्यातील पेण गुरव आळी उत्सव मित्र मंडळ आयोजित मेहनत-एकजूट-एकच ध्येय या ब्रीदवाक्यानुसार श्री सत्यनारायण महापूजा आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम स्थानिक मित्रपरिवार, समाज बांधव, मित्रपरिवार कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये पेण गुरव आळी येथे पार पडला. यावेळी या स्नेहसंमेलनासाठी पेणचे युवा नेते माजी उपनगराध्यक्ष दीपक जयवंत गुरव यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक गुरव समाज मित्र परिवारातील गुरव समाज बांधव त्याचबरोबर अन्य विद्यार्थी यांचे संस्थेच्या वतीने रोख स्वरूपात त्याचबरोबर गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्था अध्यक्ष बंडू विरेश्वर खंडागळे यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक स्थानिक महिला भगिनी, विद्यार्थी, समाज बांधव त्याचबरोबर बाल गोपाळ मुलामुलींनी आपापल्या व्यक्तिगत आणि समूहासह सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मंडळाच्या वतीने ना नफा-ना तोटा लॉटरीचे आयोजन देखील केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष मंगला जयवंत गुरव, मा. उपनगराध्यक्ष, नगरसेवक दीपक गुरव, गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्था अध्यक्ष बंडू खंडागळे, कार्याध्यक्ष सुरेश गुरव, स्थानिक अध्यक्ष विलास देशमुख, दिनेश सावंत, प्रकाश शेठ गुरव यावेळी मंचावर उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे प्रतिवर्षी असे कार्यक्रम घेण्यासाठी अनेक ग्राउंड झिरोचे कार्यकर्ते ज्यांच्यामुळे असे समाज हिताचे कार्यक्रम यशस्वी होतात आणि नेहमी हे कार्यकर्ते पडद्यामागे असतात आणि अशा कार्यक्रमांमध्ये ते पडद्यामागूनच सक्रिय सहभागी असतात त्या प्रत्येकाची नावे घेणे क्रमप्राप्त आहे. या कार्यक्रमासाठी विशेष करून प्रामुख्याने अजित अहिर, प्रशांत ढवळे, मनोहर गुरव, हेमंत अहिर, विनायक ढवळे, सचिन गुरव, समीर पोटे, अभिजीत गुरव, अजिंक्य खरे, विनोद ढवळे, रोहन ढवळे, विलास देशमुख, निनाद सावंत, सिद्धू सावंत, अरविंद गुरव, विलास ढवळे, प्रथमेश ढवळे, अभिषेक गुरव, निलेश गुरव, प्रवीण गुरव, संजय तांडेल, रमेश देशमुख, विश्वास गुरव, पुष्कर गुरव, ओंकार गुरव, भूषण ढवळे, प्रसाद ढवळे, उदय ढवळे, केदार ढवळे, अमेय अहिर, अंकित अहिर, अमोल ढवळे, दिनेश सावंत, अथर्व सावंत, प्रथमेश वेदपाठक, ऋतुराज खंडागळे, सचिन टेकावडे, शामकांत ढवळे, भूषण ढवळे सुदेश कुंभार श्याम ढवळे, हरेश खंडागळे, अन्य अनेक युवा स्थानिक कार्यकर्ते यांचा सहभाग असतो. परंतु प्रमुख कार्यकर्त्यांवरती याची मोठ्या प्रमाणात जबाबदारी असते. त्याचबरोबर घरातील सर्व महिला मंडळ यांचा या कार्यक्रमांमध्ये विशेष सहभाग असतो. सर्वांना एकत्रित घेऊन वर्षभरामध्ये अनेक सार्वजनिक समाजहिताचे कार्यक्रम याच पद्धतीने गुरवआळी येथे गुण्यागोविंदाने साजरे केले जातात.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने दुपारी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन आणि सायंकाळी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमात सर्व युवा कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ समाजबांधवांचे, मित्रपरिवाराचे त्याचबरोबर महिला मंडळाचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. लोकवर्गणीतून केले जाणाऱ्या कार्यक्रमासाठी अशा कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुकच आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक ढवळे यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!