किरण लाड
नागोठणे : काही दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तो प्रवेश ताजा असताना नागोठणे विभागातील वांगणी येथील ग्रामस्थांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
भाजपा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या कुशल, कार्यक्षम नेतृत्व तसेच पेण, रोहा, सुधागड विधानसभेचे अध्यक्ष प्रसाद भोईर यांच्या कामाचा धडाका, तत्पर कार्यशैली बघून त्यांच्या उपस्थितीत वांगणी येथील प्रसिद्ध कीर्तनकार हभप दळवी महाराज, वांगणी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच लतिका दळवी, भारतीय कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष कांचन ठाकूर, दिपक दळवी, स्मिता ठाकूर, संदिप दळवी, नविन दळवी आदी ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षाध्ये प्रवेश केला आहे.

सदर भाजपा पक्ष प्रवेशावेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, भाजपा रोहा तालुका महिला अध्यक्ष अपर्णा सुटे, अंकुश सुटे, माजी विभागीय अध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे, रंजन जांभेकर, शरद ठाकूर, सुरेश तेलंगे आदी पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेण सुधागड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रसाद भोईर यांनी पक्षप्रवेशा बोलताना सांगितले कि, अजून अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ नागोठणे तसेच विभागातुन येत्या काही दिवसात दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर, कार्यपध्दतीवर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.