अलिबाग पोलिस ठाण्यात नोंद
अमुलकुमार जैन
अलिबाग : तालुक्यातील वाडगाव फाटा नजिक मुरूड आगाराची बस क्रमांक एमएच 20 बीएल 3257 ही बस मुरूड ते बोरीवली अशी चालवित असताना मौजे वाडगाव फाटा येथे सुमारे 100 मीटर मागे बसचे चालक आरोपी हेमंत रामदास मसराम रा. चिखलपाखाडी, ता. मुरूड, मुळ रा.डोंगरगाव, ता. मुल, जि. चंद्रपुर
याने मद्यप्राशन करून गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांचे जिवितास धोका निर्माण होईल अशारितीने रस्त्याचे विशिष्ठ परीस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने बस चालवून रस्त्याचे बाजूस असलेल्या वडाच्या झाडाला ठोकर मारून अपघात केला. तसेच बसचे नूकसानीस कारणीभूत झाले. याबाबतची तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात अभिजित हरिश्चंद्र मांढरे (वाहतूक निरीक्षक, अलिबाग आगार) यांनी केली आहे.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 06/2024 भा.दं.वि.क. 279, 427 , मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 184,185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोहवा/अमर जोशी हे करीत आहेत.