क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झुंझार युवक मंडळ पोयनाड यांच्यावतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेमध्ये पोयनाड व्यापारी असोसिएशन, पोयनाड विद्युत महावितरण प्राधिकरण, पोयनाड महसूल विभाग आणि झुंझार वॉरियर्स क्रिकेट संघ सहभागी झाले होते. प्रथम साखळी व नंतर बाद फेरीनुसार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती,
अंतिम सामना पोयनाड महसूल विभाग विरुद्ध झुंझार वॉरियर्स संघामध्ये झाला. त्यामध्ये पोयनाड महसूल विभागाने झुंझार वॉरियर्स संघाचा पराभव करत अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला आहे. झुंझार वॉरियर्स संघाला द्वितीय, पोयनाड विद्युत महावितरण प्राधिकरण संघांने तृतीय तर पोयनाड व्यापारी असोसिएशन संघांनी चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ठ खेळ करणारा महसूल विभागाचा कल्पेश नाईक याला मालिकावीर, उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून महावितरण संघाचा सागर वालेकर, उत्कृष्ठ फलंदाज महसूल विभागाचा रोशन पाटील तर उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून झुंझार वॉरियर्स संघाचा महेंद्र पालव यांना सन्मानित करण्यात आले.
बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमासाठी झुंझारचे अध्यक्ष अन्वर बुराण,सचिव किशोर तावडे, ग्रामपंचायत सदस्य किशोर जैन, अजित चवरकर, खजिनदार दिपक साळवी, भारतीय सैन्य दलाचे सैनिक उदय चवरकर, व्यापारी अससोसिएशनचे सदस्य भरातशेठ जैन, झुंझारचे सदस्य अजय टेमकर, मंडळ अधिकारी महेश निकम, महावितरणचे शिवाजीराव ठोंबे, पंकज चवरकर, सुजित साळवी, शैलेंद्र गायकवाड, राजेंद्र जाधव, निहाल चवरकर, ॲड. पंकज पंडित, बंटी टेमकर, अविनाश सावंत यांच्यासह पोयनाड विभागातील क्रीडा रसिक व खेळाडू उपस्थित होते.