किरण लाड
नागोठणे : येथील श्री कानिफनाथ क्रिकेट क्लब, मराठाआळी आयोजित नाईट अंडर आर्म बाॅक्स क्रिकेटच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धा पेण-सुधागड मतदार संघाचे अध्यक्ष, भाजपा युवा नेते प्रसाददादा भोईर यांनी पुरस्कृत केल्या होत्या. श्री कानिफनाथ क्रिकेट क्लब मराठाआळी अ व ब संघाने नागोठणे क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाईट अंडरआर्म बाॅक्स पध्दतीच्या क्रिकेट स्पर्धा शनिवार दि. 27 जानेवारी व रविवार दि. 28 जानेवारी या दिवशी मराठाआळीच्या मैदानावर आयोजित केल्या होत्या. दोन दिवस चाललेल्या क्रिकेट स्पर्धेला क्रिडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

शनिवार, दि. 27 जानेवारी रोजी झालेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ओम साई खडकआळी संघाने पटकावला, तर जय हनुमान आंगरआळी संघाने व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे श्री कानिफनाथ क्रिकेट क्लब मराठाआळी व स्वराज जोगेश्वरी नगर संघाने पटकाविला. या सामन्यांमध्ये सामनावीर व मालिकावीर म्हणून ओम साई संघाच्या बल्लाल याला गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट गोलदांज म्हणून जय हनुमान आंगरआळीचा रोहन ठरला. उत्कृष्ट फलदांज म्हणून श्री कानिफनाथ मराठाआळी संघाच्या ऋषिकेश भगत याला गौरविण्यात आले.
तर रविवार दि. 28 रोजी संपन्न झालेल्या अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्वराज जोगेश्वरी नगर, व्दितीय ओम साई खडकआळी, तर तृतीय जोगेश्वरी नगर ब तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक श्री कानिफनाथ क्रिकेट क्लब मराठाआळी संघाने पटकाविले. तर या स्पर्धेमध्ये सामनावीर व मालिकावीर स्वराज संघाच्या अतुल यांनी पटकावले तर उत्कृष्ट गोलदांज ओम साई संघाचा भवन ठरला तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून स्वराज संघाच्या पार्थ या खेळाडूला गौरविण्यात आले.
श्री कानिफनाथ क्रिकेट क्लब मराठाआळीने आयोजित केलेल्या भव्य अशा नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पेण-सुधागड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष, भाजपा युवा नेते प्रसाददादा भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, रोहा तालुका भाजप सरचिटणीस आनंद लाड व एकनाथ ठाकूर, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा अर्पणाताई सुटे, कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निखिल मढवी, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर शिर्के, रोहा तालुका क्रिडा संयोजक शेखर गोळे, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, माजी विभागीय अध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष अंकुश सुटे, शिक्षण तालुका सेलचे अध्यक्ष अशोक अहिरे, शिक्षण सेलचे उपाध्यक्ष धनराज उमाळे, नागोठणे विभागीय महिला मोर्चा सरचिटणीस मुग्धा गडकरी, मराठी उद्योजक सुदेश येरुणकर, रायगड जिल्हा कुंभार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद नागोठणेकर, नागोठणे शहर सरचिटणीस तिरतराव पोलसानी, भाजपचे युवा कार्यकर्ते विशाल म्हात्रे, मराठी उद्योजक पवन जगताप, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विवेक रावकर आदी मान्यवर व भाजपचे कार्यकर्ते, मराठाआळी ग्रामस्थ तसेच केएमजी विभागातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री कानिफनाथ क्रिकेट क्लब मराठाआळी संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, खेळाडू, ग्रामस्थ यांनी अपार मेहनत घेतली. एकंदरीत या भव्य दिव्य अंडरआर्म बाॅक्स क्रिकेटच्या स्पर्धा कोणतेही विघ्न न येता मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.