• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावजवळ दुचाकीची रिक्षाला धडक, ५ जखमी

ByEditor

Feb 3, 2024

सलीम शेख
माणगाव :
माणगावपासून ९ किमी अंतरावर इंदापूर-तळा रस्त्यावर इंदापूर येथील मंदिरासमोर भरधाव दुचाकीने (मोटारसायकल) विरुद्ध दिशेला येत ऑटो रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांमधील मिळून ५ जण जखमी झाले. सदरील अपघात शुक्रवार, दि. २ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३ :३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद समीर अब्दुल गनी परदेश (वय -३१) रा. निजामपूर ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील आरोपी दुचाकीवरील चालक सुरेश चंदर कोळी रा. मूठवली तर्फे तळे याने त्याच्या ताब्यातील दुचाकी गाडी क्र. एमएच ०६ बीएच ४२८० हि इंदापूर बाजूकडून तळा बाजूकडे अति वेगाने घेऊन येत असताना समोरून ऑटो रिक्षा क्र. एमएच ०६ बीव्ही १०३० या गाडीला समोरून धडक लागल्याने अपघात घडला. या अपघातात झाकीर अब्दुल गनी परदेशी, मुजम्मिल हसन राऊत, जलील हुसेन लोखंडे (तिन्ही रा. निजामपूर ता. माणगाव) सुरेश चंदर कोळी (रा. मूठवली तर्फे तळे ता. माणगाव), रोहिदास जाधव (रा. बोरघार ता. तळा) हे ५ जण जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. १८/२०२४ भादवि कलम २७९, ३३७ मोटारवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दोडकुलकर हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!