• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वारस नोंद करण्यासाठी लाच मागणारी महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात

ByEditor

Feb 7, 2024

मिलिंद माने
महाड :
वारस नोंद करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या महिला तलाठीवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून कारवाई केल्याची घटना महाड तालुक्यात घडली.

याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड तालुक्यातील तळोशी गावाच्या हद्दीतील सर्वे नंबर २३/४, २४/१३, २५/१, ३१/५, ४७/१४, ३२/४, २५/१८ तर नांदगाव खुर्द येथील सर्व्हे नंबर १८२, १९७, ८० या वडिलोपार्जित शेत जमिनीमध्ये वारस नोंद करण्याकरता ६ हजार रुपयांची मागणी तलाठी शिल्पा पवार यांनी केली. याबाबत शरद दत्ताराम चव्हाण रा. नालासोपारा यांनी लाचलुचप प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची शाहनिशा करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवार, दि. ७ /२/२०२४ रोजी दुपारी १२:४० वाजता सापळा रचून ही कारवाई केली. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व ७ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महाड तालुक्यातील बहुतांशी तलाठी मागील वर्षभरापासून वारस नोंदीच्या प्रकरणाबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असून अशा सर्व प्रलंबित वारस नोंदी असणाऱ्या तलाठ्यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागाने चौकशी चालू करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!