• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

६ आसनी चालक-मालक संघटनेच्या मागणीला यश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे मानले आभार

ByEditor

Jun 26, 2023

विश्वास निकम
गोवे-कोलाड :
शासनाने आदेश पारित केलेल्या इको फोर व्हीलर गाडी गोरगरीब मिनिडोअर चालकांना न परवडणारी असल्यामुळे पर्यायी म्हणून जेएमए निर्मित पेट्रोल सीएनजी गाडी पासिंग होण्यासाठी आ. भरत गोगावले व आ. महेंद्र दळवी यांना निवेदन देण्यात आले होते. याची पूर्तता करण्यासाठी दि. १७ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात मिटिंग लावुन ग्रामीण रायगड जिल्हा ६ आसनी चालक मालक संघटनेची मागणी कोरोनाकाळातील दोन वर्षे वाढवून मिळावी व पर्यायी ३ चाकी ६ आसनी गाडी मिळावी म्हणून आ. भरतशेठ गोगावले व आ. महेंद्रशेठ दळवी यांनी विशेष सहकार्य करुन संघटनेच्या मागणीची पूर्तता केली.

रायगड ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष प्रफूल भगत, सुरेश घरत, प्रदिप पवार, विश्वास बागुल, जे. जे. खाडे, चेतन परबळकर, सचिन धाडवे, मयुर दळवी, विशाल म्हात्रे, जंगम, स्वप्नील शिगवण, सनी पारठे, दिनेश महाले, हेमंत बिरवाडकर, सिकंदरभाई, निसारभाई यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार मानले

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!