सरखेल कान्होजी आंग्रे शिवप्रतिष्ठान मित्रमंडळानी घेतला पुढाकार
किरण लाड
नागोठणे : सकल हिंदूस्थानाचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती नागोठण्यातील सरखेल कान्होजी आंग्रे शिवप्रतिष्ठान मित्रमंडळातर्फे मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
सालाबादप्रमाणे तारखेप्रमाणे येणारी शिवजयंती सोमवार, दि. 19 फेब्रुवारी रोजी नागोठणे येथील आंगरआळी येथे साजरी होणार आहे. यानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे. शिवप्रतिष्ठान मित्रमंडळाचे शिवभक्त दि.18 फेब्रुवारी रोजी किल्ले रायगड येथे शिवज्योत आणण्यासाठी जाणार आहेत. शिवज्योतीचा प्रवास रायगड ते नागोठणे असा असणार आहे. त्यानंतर सोमवार, दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 ते 11.30 अभिषेक, सायंकाळी 4 ते 6 शिवज्योत प्रदशिणा व पालखी सोहळा मिरवणूक, सायंकाळी 7 ते 8 जिजाऊ ग्रुप आंगरआळी यांचे हरिपाठ, रात्री 8 ते 9 सर्व शिवभक्त, ग्रामस्थांसाठी महाप्रसाद, रात्री 9.30 ते 11.30 वा. मावळ येथील प्रसिद्ध शिवव्याख्याते सतीशभाऊ साते यांचे व्याख्यान होणार आहे.
रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन सरखेल कान्होजी आंग्रे शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ आंगरआळी नागोठणे यांनी आयोजित केले असून त्याचा लाभ सर्व शिवभक्त, नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शिवप्रतिष्ठानाचे अध्यक्ष चेतन कामथे, उपाध्यक्ष पंकज कामथे, कार्याध्यक्ष संजय पिंपळे, सचिव अल्विन नाकते, सह सचिव किरण पवार, खजिनदार कैलास गोरे, सह खजिनदार संदिप शिर्के यांनी केले आहे.