महाडमधील धक्कादायक प्रकार! मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक
मिलिंद माने
महाड : मागील सहा वर्षापासून सातत्याने एका महिलेवर बलात्कार करून मोबाइलद्वारे तिचे अश्लील व्हिडिओ व फोटो आपल्या मित्रांमध्ये व्हायरल करून त्या बदल्यात पैसे उकळणाऱ्या एका मुख्य आरोपीसह अन्य चार जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची खळबळजनक घटना महाड तालुक्यात घडली आहे.

महाड शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी संबंधित पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार या महिलेवर सन २०१८ पासून मुख्य आरोपीद्वारे बलात्कार करण्यात आला असून मोबाईलवर संबंधित महिलेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते आपल्या मित्रांमध्ये मोबाईलद्वारे प्रसारित करून व इतर अन्य ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या बदल्यात सातत्याने पैशाची मागणी करीत संबंधितांकडून दोन लाख वीस हजार रुपये उकळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुख्य आरोपी इमरान इब्राहिम अंतुले राहणार चांढवे, महाड रायगड यांच्यासह सनाउल्ला पोरे, अयनान सनाउल्ला पोरे (दोघेही राहणार गोरेगाव, माणगाव), मैनुद्दीन हिदायत ढोकले (रा. लाडवली मोहल्ला महाड) आणि अकील अफसर फामे (रा. महाड) अशा पाच जणांवर भादवि कलम ३७६,२(एन), ३४२,३५४ (अ)(एक) (दोन), ३५४,३५४(ड), ३८४, ३८५, ५०६, ३३४ प्रमाणे माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७(अ) नुसार महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी करीत आहेत.