• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सामाजिक कार्यकर्ते कैलास घरत “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार 2024” पुरस्काराने सन्मानित

ByEditor

Feb 19, 2024

कैलास घरत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

विनायक पाटील
पेण :
तालुक्यातील खारपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, कर्तृत्ववान व्यक्तीमत्त्व, शिवशंभू भक्त, शिव शंभू चरित्र इतिहास अभ्यासक, दुर्गरक्षक, व्यसनमुक्तीदूत राज्यस्तरीय कोकणभूषण, समाजरत्न पुरस्कार विजेते, महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार-2023, राजमाता जिजाऊ राष्ट्रीय गौरव सन्मान-2024 राष्ट्रीय पुरस्कार विजेते, युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास कमलाकर घरत यांना सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आस्था सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार 2024” सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व असे उपजत गुण अंगी असलेले कैलास घरत हे शिव शंभूचरित्र इतिहास अभ्यासक असून शिवकार्य हेच त्यांचे जीवन कार्य आहे, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचा खरा इतिहास विद्यार्थी, युवा वर्गाला समजावा यासाठी शिवशंभू जयंती उत्सव, शिवराज्याभिषेक सोहळा, शिवशंभू चरित्र व्याख्यानमाळा, ऐतिहासिक शिवशंभू प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, गडसंवर्धांचे महत्व समजावून तरुण पिढीला गडकोट स्वच्छता मोहिमांमध्ये सहभागी करत आहोत. कारण ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही तो समाज आपला इतिहास घडवू शकत नाही. हा इतिहास आहे. महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी गडकोटांच्या रक्षणासाठी कटिबध्द होऊया. मनुष्यसेवा हीच ईश्वर सेवा मानून तळागाळातील गोर गरीब गरजू व्यक्तीना मदत करणे, आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक पणे ,निस्वार्थी वृत्तीने प्रयत्न करीत आहेत. आदिवासी वाडी वस्त्यांवर बालविवाह प्रतिबंधक जनजागृती करत आहेत.

आजपर्यंत कैलास कमलाकर घरत यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांची पुरस्कारांची मालिका सुरूच आहे. 25 फेब्रुवारी 2024 रोजी वेध फाउंडेशन कोल्हापूर, समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग, अनुश्री महिला संस्था नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय दिपस्तंभ कला साहित्य संमेलन ठाणे-2024
“नॅशनल एक्सलेंट अवॉर्ड” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

गेली 15 ते 20 वर्षे ते अनेक कला, क्रीडा, सामाजिक सांस्कृतिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबिर, रोजगार मार्गदर्शन, ,महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, व्यक्तीमत्त्व विकास कार्यशाळा, एसएससी, एचएससी विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ, विद्यार्थि पालक शिक्षक सुसंवाद कार्यशाळा, रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा, मधुमेह मुक्ती, नशामुक्ती, गडसंवर्धन, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, फायर अँड सेफ्टी, रोजगार मार्गदर्शन आणि सहकार्य, गड स्वच्छता अभियान असे उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत राबवित आहेत. त्यांच्या शिवकार्याची योग्य दखल घेत शिवकार्यात सदैव अग्रेसर असलेल्या योग्य व्यक्तीला समाजसेवक कैलास कमलाकर घरत यांना “छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र गौरव पुरस्कार 2024” प्राप्त झाल्याने समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनासह कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या हातून शिवकार्य आणि समाजसेवा घडत राहो अशा सदिच्छा देत पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!