उत्सवात शिवभक्तांचा उत्साह, रायडावरून आलेल्या शिवज्योतींचे जागोजागी जंगी स्वागत
शशिकांत मोरे
धाटाव : सर्वत्र साजरा करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात शिवभक्तांचा उत्साह आनंद गगनात मावेना असा होता. शिवजंतीचे औचित्य साधुन किल्ले रायगड़ावरून आणण्यात आलेल्या शिवज्योतीचे धाटावमध्ये जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी तर काही ठिकाणी औक्षण करून जंगी स्वागत करण्यात येत होते. यामध्ये महिला विशेषतः तरुण वर्गाचा सक्रिय सहभाग असल्याचे पहावयास मिळाले. याठिकाणी शिवरायांच्या जयघोषाने मात्र सबंध धाटाव अक्षरशः दणाणून गेल्याचे पहावयास मिळाले.
शिवजयंतीनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर जयघोष केला जात होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा विविध जयघोषाने संबंध परिसर दणाणून गेला होता. गावात सर्वत्र भगव्या पताका तर संबंध रस्त्यावरुन रांगोळ्या काढून परिसर स्वच्छ केला होता.
किल्ले रायगडवरुन रोहयाकडे पहाटे प्रस्थान झालेल्या शिवज्योतीचे कोलाडपासून गावात जात असताना रस्त्यात जागोजागी पुष्पहार व औक्षण करून स्वागत केले जात होते. जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी केली जात होती. याठिकाणी महिलावर्ग, तरुण युवक यासह बाळगोपळांचा सहभाग मोलाचा ठरला. याठिकाणी तरुण वर्गाला इतिहासाची महती समजावी, शिवरायांचे चरित्र समजावे, शिवरायांनी वापरलेली गुप्तहेर यंत्रणा कशी होती यावर प्रबोधन केले. त्यानंतर प्राध्यापक शिवश्री नामदेवराव जाधव लिखित ‘द शिवाजी ग्रेट मॅनेजमेंट’ यासह इतर पुस्तके ही भेट स्वरूपात त्यांच्या शुभहस्ते ग्रामस्थांना देण्यात आली. याठिकाणी तरुणवर्गाने सबंध गावकऱ्यांना शिवभोजनाची व्यवस्था केली होती. त्याचा अनेकांनी लाभ घेतला. तर हा शिवजयंती उत्सव आम्हा सर्वांना प्रेरणा देणारा ठरला असे अनेक शिवभक्तांनी सांगितले.