• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावजवळ ताम्हिणी घाटात दुचाकी दरीत कोसळून अपघात, एकाचा मृत्यू

ByEditor

Feb 20, 2024

सलीम शेख
माणगाव :
माणगाव- पुणे रस्त्यावर १५ किमी अंतरावर ताम्हिणी घाटात सणसवाडी गावच्या हद्दीत भरधाव वेगाने येणारी पल्सर दुचाकी गाडी वळणावर रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळून अपघात घडला . या अपघातात गाडीच्या पाठीमागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. सदरची घटना सोमवार, दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद चांगदेव शाम मावळे( वय -२१ ) रा. शिराळा जि . बुलढाणा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, या अपघातातील आरोपी दुचाकी चालक प्रवीण भागवत लोहगले (वय -२१) रा. बालेवाडी जि. पुणे हा त्याच्या ताब्यातील पल्सर मोटारसायकल क्र. एमएच १२ एचयू ००६९ या गाडीवर आपला सहकारी मित्र याला पाठीमागे बसवून बालेवाडी ते रायगड किल्ला असे ताम्हिणी घाटमार्गे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून येत असताना वळणावर आल्यावर रस्त्याच्या बाजूला असलेल्या घाटाच्या दरीत जाऊन दुचाकी कोसळून अपघात घडला. या अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेले वैभव शिवदास काळे (वय-२१) रा. बालेवाडी जि. पुणे यांचा मृत्यू होऊन गाडीचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि . नं . २७/२०२४ भादंवि कलम ३०४ अ , २७९ , ३३७,३३८,४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार करण्यात येऊन आरोपी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!