• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

किल्ले रायगड परिसरातील नेवाळी गावातील तरुणाची आत्महत्या

ByEditor

Feb 20, 2024

मिलिंद माने
महाड :
किल्ले रायगड परिसरातील नेवाळी गावातील २१ वर्षीय तरुणाने सोमवारी रात्री आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नेवाळी गावामध्ये राहणाऱ्या अभय वसंत शिंदे (वय 21) हा सोमवारी रात्री घरी आला असता रात्रीच्या सुमारास त्याने घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ही घटना उघड झाली. याबाबत तत्काळ महाड तालुका पोलीस ठाण्याला कळविण्यात आले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रीतसर पंचनामा केला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सदर मयत तरुण हा महाड औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. सोमवारी रात्री तो आपल्या गावी आला असता त्याने ही आत्महत्या केल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर मूळ नेवाळी गावामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक तपास महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!