• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावात कोकण रेल्वेतुन पडून महिलेचा मृत्यू

ByEditor

Feb 22, 2024

सलीम शेख
माणगाव :
चालत्या रेल्वेतून खाली पडून ४० वर्षीय महिलेला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यु झाला. सदरची घटना गुरुवार, दि. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०:२५ वाजता माणगांव रेल्वे स्टेशन येथील विजेचा पोल नंबर ३०/०६ ते ३०/०८ च्या दरम्यान घडली. याबाबतची खबर प्रतिक दामोदार मेश्राम रा. वरसगाव-कोलाड, ता. रोहा यांनी माणगाव पोलिस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत माणगांव पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील सदर महिला सुराणी देवनीश डुंगडुंग (वय-४०) रा. पहाणटोळी, रा. झारखंड व त्यांचे पती देवनीश हाबील डुंगडुंग असे रेल्वे गाडी क्र. १०१०३ मांडवी एक्स्प्रेसमधुन मुंबई ते मडगाव असा प्रवास करीत असताना सदरची महिला रेल्वे माणगांव रेल्वे स्टेशन येथील विजेचा पोल नं. ३०/०६ ते ३०/०८ च्या दरम्यान आल्यावर रेल्वेतून खाली पडल्या. या महिलेला उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे औषधोपचाराकरिता आणले असता येथील डॉक्टरांनी तिला तपासून दुपारी १२ वाजता मृत झाल्याचे घोषित केले.

या घटनेची नोंद माणगांव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु रजि. नं १०/२०२४ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल कारण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आघाव हे करित आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!