• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण एसटी डेपोत बसने महिलेला चिरडले

ByEditor

Feb 27, 2024

घन:श्याम कडू
उरण :
उरण एसटी डेपोत आज पहाटेच्या सुमारास एसटी बसच्या मागच्या टायर खाली महिलेला चिरडले. उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. चालकाला अटक करण्यात आली आहे. नातेवाईकांनी बस बंद पाडल्याने प्रवाशांचे हाल झाले. दोन दिवसांपूर्वी एनएमएमटी बस सेवा बंद झाली आता एसटीही अपघातामुळे बंद झाल्याने प्रवाशी वर्गांचे हाल होत होते.

आज पहाटेच्या ५च्या सुमारास नेहमीप्रमाणे कालिदा भीमराव शरणागत (५२) हि महिला नेहमीप्रमाणे गाड्या धुण्याचे काम करीत होती. यावेळी अचानक दुसऱ्या बसच्या चालकाने गाडी मागे घेत असताना महिला न दिसल्याने तीच्या अंगावरून मागील टायर गेल्याने ती जबर जखमी झाली. महिलेस उपचारासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान सदर महिला मयत झाली. यानंतर वातावरण तंग होऊन नातेवाईकांनी बस डेपोतून बस बाहेर पडू दिल्या नाहीत. यामुळे काहीवेळ बस वाहतूक बंद पडली.

घटनास्थळी पुणे मुबंई प्रादेशिक उपव्यवस्थापक श्रीनिवास जोशी व इतर अधिकारी दाखल झाले. तसेच उरण पोलीस ठाण्याचे क्राईमचे निरीक्षक कांबळे, भाजपचे रवी भोईर यांनी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मयताच्या नातेवाईकांने वारसास कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी लावून धरत डेपोतून बस जाऊ दिल्या जात नसल्याने वाहतूक बंद पडली होती. यावेळी एसटी बसच्या अधिकारी वर्गांनी आम्ही ताबडतोब १० हजाराची मदत करू शकतो, त्यानंतर काही दिवसांनी आमच्या फंडातून १० लाखांची मदत करू व नोकरीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला जाईल असे पुणे मुबंई प्रादेशिक उपव्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईमचे कांबळे हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!