• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उद्धव ठाकरे ३ मार्च रोजी उरणमध्ये

ByEditor

Feb 27, 2024

घनःश्याम कडू
उरण :
माजी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा उरण दौरा जाहीर झाला असून ते येत्या रविवारी (दि. ३ मार्च) उरण नवीन शेवा येथे जाहीर सभा घेणार आहेत.

लोकसभा तसेच इतर निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. मावळ लोकसभा मतदार संघ जिंकण्यासाठी आतापासूनच प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील उरण नवीन शेवा येथील द्रोणागिरी नोड मैदानावर रविवार, दि. ३ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सभेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!