बोर्ली पंचतनमध्ये विविध विकासकामांचे खा. तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
अभय पाटील
बोर्ली पंचतन : श्रीवर्धनमध्ये प्रत्येक धर्म आपली धार्मिक भावना जोपासताना सर्वधर्मसमभाव देखील उत्तम प्रकारे जोपासत आहे. श्रीवर्धनमध्ये पुरातन मंदिरे आहेत याचा नव्याने जिर्णोद्धार करून याद्वारे श्रीवर्धनमधील पर्यटन वाढण्यासाठी निश्चित हातभार लागेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले. बोर्ली पंचतनमध्ये 25 लक्ष रूपयाच्या शंकर मंदिर व 1 कोटी रुपयाच्या गुजराथी समाज ज्ञान मंदिराच्या भक्त निवास बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक विकास योजनेतून बोर्ली पंचतन येथील पुरातन शंकर मंदिर जिर्णोद्धारासाठी 25 लक्ष रुपयाचा निधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग बोर्ली पंचतन येथील गुजराथी समाजाचे श्री गुरुदत्तात्रेय भगवान ब्रह्मनिष्ठ श्री जगजीवन बापू महंत श्रीमत जीवन बापू ज्ञान मंदिर दक्षिण सिमर येथील नव्याने भक्त निवास बांधकामासाठी 1 कोटी रुपयाचा निधी मंजुर असून या बांधकामांचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी महंमद मेमन, प्रमुख प्रवक्ता शाम भोकरे, सरपंच ज्योती परकर, माजी सरपंच गणेश पाटील, उदय बापट, माजी सभापती स्वाती पाटील, मनसुख कोठारी, चंद्रकांत कोठारी, दीपक कोठारी, शैलेश शहा, नरेश कोठारी, मयूर शहा, प्रकाश शहा, दिनेश कोठारी , माजी उपसरपंच लिलाधर खोत, मंदार तोडणकर, सुचिन किर, विश्वास तोडणकर, चिंचबादेवी देवस्थान समिती अध्यक्ष सुजित पाटील, शिव शंकर मंदिर समीती अध्यक्ष इंद्रकांत हावरे, सचिव प्रशांत नांदविडकर सर्व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपल्या मनोगतामध्ये खासदार सुनील तटकरे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्याने भारतीयांच्या माना उंचावण्यासाठी प्रयत्न केला आहे. तर मागील 15 वर्षांमध्ये आपण श्रीवर्धन चा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पुढील कालावधीमध्ये आपणास खूपच चांगला बदल पहावयास मिळेल असेही तटकरे म्हणाले