शशिकांत मोरे
धाटाव : रोह्यातील औषध निर्मितीसाठी सुपरिचित असलेल्या युनिकेम लॅबोरेटरीज कंपनीतील ५२ रक्तदात्यांनी सुरक्षा सप्ताहनिमित्त रक्तदान केले.
३ मार्च ते १० मार्च दरम्यान सुरू असलेल्या ५३व्या सुरक्षा सप्ताहनिमित्त युनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेड व्यवस्थापनाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युनिकेम लॅबोरेटरीजच्यावतीने गेली ४ वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याठिकाणी प्लांट हेड मनोज मिश्रा, एचआर विभागाचे अधिकारी विलास आळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या शिबिरात कामगार वर्ग, कंत्राटी कामगार, स्टाफ मेंबर्स, मॅनेजमेंटने यामधे सक्रिय सहभाग नोंदवून ५२ बाटल्या रक्तदान करण्यात आले. जिल्हा रक्तपेढी यांच्या वतीने डॉ. गोसावी यांच्यासह त्यांच्या सहकारी वर्गाने याठिकाणी काम पाहिले. दरम्यान, रक्तदान करून सामाजिक कार्यात हातभार लागल्याचे समाधान आम्हाला लाभल्याचे याप्रसंगी कामगार वर्गाकडून सांगण्यात आले.