• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे बलस्थान आहे -आ. अनिकेत तटकरे

ByEditor

Mar 10, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन

किरण लाड
नागोठणे :
नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बलस्थान आहे. बसण्यासाठी, एकत्रित येण्यासाठी आपल्या हक्काची असावी ही नागोठणे विभागातील कार्यकर्त्यांची मागणी होती. ती आज पूर्ण होत आहे याचा मला आनंद आहे असे उद्गार विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी नागोठणे विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी काढले.

नागोठणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन विधानपरिषदेचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. नागोठणे विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बलस्थान आहे. नागोठणे जिल्हापरिषद गटात दहा ग्रामपंचायती येतात. नागोठणे पंचायत समिती गणात तीन ग्रामपंचायती येतात तर ऐनघर पंचायत गणात सात ग्रामपंचायती येतात. दहा ग्रामपंचायतींचा हा नागोठणे जिल्हापरिषद मतदार संघ असल्याने येथील कार्यकर्त्यांची आपल्या हक्काचं संपर्क कार्यालय असावं ही मागणी यानिमित्ताने आज पूर्ण होत आहे.

नागोठणे विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शिवराम शिंदे, भाई टके, सदानंद गायकर, मधुकर ठमके, प्रकाश जैन, चंद्रकांत गायकवाड, विलास चौलकर, लक्ष्मण टके, हिराजी शिंदे, संतोष कोळी, सुधाकर जवके, विनायक गोळे, प्रमोद जांबेकर, अतुल काळे, सचिन कळसकर, दिपेंद्र आवाद, दिनेश घाग, निवास पवार, मंदार चितळे, अभिषेक वाळंज, प्रथमेश काळे, अजिम पानसरे, उमेर सांगडे, अवि बामणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर अमिता शिंदे, आशा शिर्के, सुजाता जवके, प्रतिभा तेरडे, निष्ठा विचारे, रिचा धात्रक, वैजयंती चौलकर, सोनल‌ इप्ते आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या या नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपर्क कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित होत्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!