• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाड तालुक्यातील वहूर गावात दगडाने ठेचून एकाची हत्या!

ByEditor

Mar 12, 2024

पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळला

मिलिंद माने
महाड :
तालुक्यातील वहुर गावात एका बांधकामावर काम करणाऱ्या कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने या मयत व्यक्तीचे शव देखील जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. ही घटना १०/०३/२४ रोजी रात्री ते ११/०३/२०२४ च्या सकाळी ९:१३ वाजण्याच्या दरम्यान घडली असून याबाबत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वहूर गावच्या उगवती वाडीमध्ये एका खाजगी जागेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू होते. या ठिकाणी काम करणारे कामगार समोर असलेल्या हनिफ प्लाझा या इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी राहत होते. सोमवारी या इमारतीसमोर जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच महाड तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. त्याचप्रमाणे अलिबाग इथून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले. अखेर पोलीस तपासा दरम्यान हा मृतदेह या ठिकाणी काम करणाऱ्या एका कामगाराचा असल्याचे निष्पन्न झाले.

महाड शहर पोलिसांच्या तपासादरम्यान रविवारी १०/३/२०२४ च्या रात्री आणि सोमवारी ११/३/ २०२४ च्या सकाळी ९:१३ वाजण्याच्या दरम्यान ही हत्त्या झाली असून या ठिकाणी काम करणारे आरोपी छगन शामराव मोहिते (वय ३६, रा.मलकापूर जालना सध्या रा. हनिफ प्लाझा बिल्डिंग समोर मोकळ्या जागेत) आणि मयत लखन बाबाराव चव्हाण (वय २२, जाफराबाद जालना सध्या रा.हनिफ प्लाझा बिल्डिंग समोर मोकळ्या जागेत) या दोघांमध्ये ठेकेदारीवरून नेहमी होणारा वाद विकोपाला गेला आणि आरोपी छगन मोहिते यांनी लखन चव्हाण याची दगडाने ठेचून हत्या केली आणि मयत व्यक्तीला या इमारतीच्या मोकळ्या जागेमधून बाहेर खेचत आणून समोरील नाल्यात टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सध्या आरोपी हा महाड शहर पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर भादंवी कलम ३०२/३०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!